लॉकडाऊनच्यकाळात वेळ घालविण्यासाठी मोबाईलवर लूडो गेम खेळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या खेळात डायसवर 6 पडेपर्यंत टोकन्स (सोंगट्या) बाहेर पडत नाही. डायसवर 6 पडल्यानंतरच टोकन्स बाहेर येतात व खेळ सुरू होतो. मात्र मुंबई पोलिसांनी लुडोच्याच साहय्याने दाखवले आहे की बाहेर न पडणेच हे सर्वात सुरक्षित आहे.
‘लूडोच्या सोंगट्यांप्रमाणे घरातच रहा’, मुंबई पोलिसांनी हटके पद्धतीने नागरिकांना केले जागृक
मुंबई पोलिस हे आपल्या हटके सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखले जाते. आता मुंबई पोलिसांनी लूडोचा फोटो शेअर करत घरातच राहणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, चारही रंगाचे टोकन्स आपआपल्या घरातच आहेत. मात्र घराच्या बाहेर पडल्यास एका विचित्र धोक्याला सामोरे जावे लागू शकते. बोर्डवर पोलिसांनी कोरोना व्हायरसचे चिन्ह देखील दिले आहे.
So creative my god!!🍁😍🙏
— Sonam Upadhyay (@Sonam22Upa) May 4, 2020
Good one ☝️, very creative !!!
— Vinay Dalvi (@vny1982) May 4, 2020
नेटकऱ्यांना देखील मुंबई पोलिसांची जागृकता पसरविण्यासाठी वापरलेली क्रिएटिव्हिटी खूपच आवडली. ट्विटरवर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.