हा वकील ‘यमराज’ बनून करत आहे कोरोनाबाबत जनजागृती

कोरोना व्हायरस महामारीच्या काळात लोकांमध्ये जागृकता पसरविण्यासाठी विविध हटके पद्धतींचा वापर केला जात आहे. भारतातील काही शहरांमध्ये तर यमराजाच्या वेशात पोलीस नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहेत. अशाच प्रकारे फ्लोरिडा येथील वकिलाने नागरिकांना परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी चक्क ग्रीम रीपरचा (एकप्रकारे यमराज) वेश धारण केला आहे.

फ्लोरिडामधील समुद्र किनारे नागरिकांसाठी सुरू केल्यानंतर डेनियल उल्फेल्डर हे अशाप्रकारे लोकांना परिस्थितीची जाणीव करून देत जागृक करत आहेत. डेनियल यांची ही हटके पद्धत सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

काळ्या रंगाचा मोठा झगा, लांब कोयता आणि फेसमास्क लावलेला डेनियल यांचा फोटो व्हायरल होत आहे. डेनियल यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवर लोकांना सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यास सांगतानाचा समुद्र किनाऱ्यावरील फोटो शेअर केला आहे.

https://twitter.com/KennethSikora/status/1256309408608509953

डेनियल यांनी फ्लोरिडातील सर्व समुद्र किनाऱ्यावर मृत्यूचा दूत बनून फिरत लोकांना जागृक करत आहेत. डेनियल यांच्या या हटके कृत्याला अनेक नेटकऱ्यांनी देखील पाठिंबा दर्शवत, त्यांचे कौतूक केले.

Leave a Comment