एलॉन मस्क आणि गर्लफ्रेंडच्या घरी बाळाचे आगमन

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांची गर्लफ्रेंड ग्रिम्सने बाळाला जन्म दिला आहे. 48 वर्षीय मस्क आणि म्यूझिशियन ग्रिम्स 2018 पासून सोबत आहेत. ट्विटरवर आपल्या फॉलोअर्सला माहिती देतानी आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित असल्याचे सांगितले.

ग्रिम्सचे हे पहिले बाळ आहे. तर इलॉन मस्क यांना याआधी 5 मुले आहेत. एलॉन मस्क यांचा तीन वेळा घटस्फोट झाला असून, त्यातील दोन घटस्फोट एकाच महिलेसोबत झाले आहेत.

32 वर्षीय ग्रिम्सचे खरे नाव क्लेअर बाउचर असून, तिने जानेवारीमध्ये इंस्टाग्राम पोस्टद्वारे गर्भवती असल्याची माहिती दिली होती. 2018 ला मेट गालामध्ये एकत्र येत या जोडप्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

Leave a Comment