अ‍ॅपल-गुगलचा कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप्सच्या ‘लोकेशन ट्रॅकिंग’वर बंदी घालण्याचा निर्णय

टेक्नोलॉजी कंपनी अ‍ॅपल आणि गुगलने आपल्या कोरोना व्हायरसवरील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सिस्टमवर आधारित अ‍ॅप्सच्या लोकेशन ट्रॅकिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅपल आणि गुगलची ऑपरेटिंग सिस्टम जवळपास 99 टक्के फोनमध्ये आहे. मागील महिन्यात दोन्ही कंपन्यांनी घोषणा केली होती की, ते अशा प्रणालीवर काम करत आहे जे कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या जवळ आल्यावर अलर्ट करेल. या टेक्नोलॉजीचा वापर करण्याची परवानगी केवळ सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनाच द्यावी अशी योजना या दोन्ही कंपनी बनवत आहेत.

याचा प्राथमिक उद्देश प्रायव्हेसी आणि सरकारला नागरिकांचा डाटा जमा करण्यापासून रोखणे हा आहे. ही प्रणाली ब्लूटूथ सिग्नलच्या आधारावर काम करते आणि जीपीएस लोकेशन स्टोर करत नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

मात्र अमेरिकेतील कोरोना व्हायरस संबंधित अ‍ॅप बनविणाऱ्या कंपन्यांनी म्हटले आहे की, या प्रणालीद्वारे कोरोनाग्रस्तांची ओळख करणे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा प्रणाली जीपीएस लोकेशन डाटाची परवानगी देईल.

याशिवाय आयफोन आणि अँड्राईड डिव्हाईसमध्ये बॅटरी वाचविण्यासाठी ब्लूटूथ आपोआप बंद होतात, त्यामुळे अनेकदा कोरोनाग्रस्तांचे अलर्ट मिळणार नाहीत. काही अ‍ॅप्सने मात्र आपल्या आधीच्याच योजनेवर कायम राहणार असून, गुगल- अ‍ॅपलच्या टूलचा वापर करणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान या गुगल- अ‍ॅपलने स्पष्ट केले आहे की, ते एका देशात या प्रणालीवर आधारित एकच अ‍ॅप वापरण्यास परवानगी देणार आहेत.

Leave a Comment