नांगरे पाटलांच्या आदेशानंतर भुजबळ वाईन शॉप मालकाकडून घेणार नियम पाळण्याची हमी


नाशिक – नाशिकमधील दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांची गर्दी वाढल्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी काल शहरातील सर्व वाईन शॉप बंद करण्याचे आदेश दिले होते. पण नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दुकानचालकांकडून हमी घेऊन सर्व नियमांच्या अटीवर दुकाने उघडण्याची परवानगी देऊ, अशी माहिती दिली आहे.

नाशिकमधील प्रत्येक वाईन शॉप चालकाकडून हमीपत्र घेऊ, त्याचबरोबर आम्ही त्यांच्याकडून सर्व नियम पाळण्याची हमी घेतल्यानंतरच त्यांना परवानगी दिली जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे. मी देखील लोकांना सांगू इच्छितो बेशिस्त राहिलात तर दुकाने सुरु होणार नाहीत, नियम पाळायला हवेत, कधी ना कधी दुकाने सुरु होणारच आहेत, कोणी आज करेल कोणी उद्या, असेही भुजबळ म्हणाले आहेत. आज ना उद्या दारुची दुकाने सुरु होणारच आहेत. फक्त नियम पाळावे लागणार आहेत. अनेक जिल्ह्यात सुरु झाले आणि बंदही झाले. पण ही दुकाने आज ना उद्या सुरु होणारच आहेत. या अटी शर्ती यापुढे लागू राहतील, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

Leave a Comment