नवरा रेडझोनमध्ये, नवरी ग्रीनझोंन मध्ये, पोलीस ठाण्यात विवाह


फोटो साभार कॅच न्यूज
देशातील विविध भाग, लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर हिरवा, लाल आणि केशरी रंगात विभागले गेले आहेत. उत्तरप्रदेशातील बिजनौर येथील नवरा मुलगा आणि उत्तराखंड मधील नवरी मुलगी याना यामुळे पोलीस ठाण्यात सात फेरे घेण्याची वेळ आल्याची घटना नुकतीच घडली. अर्थात पोलिसांनी या विवाहाला पूर्ण सहकार्य केलेच पण वधूवराला आशीर्वादही दिले.

झाले असे की बिजनौर कोविड १९ स्थितीत लॉकडाऊन मधील रेड झोन आहे. यामुळे येथील २८ वर्षीय अरविंद यांच्या गावी वधू पक्ष येऊ शकत नव्हता. यामुळे अरविंद यांनीच वधूघरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक प्रवास परवाना काढला पण बिजनौर सीमेवर पोलिसांनी त्यांना अडविले आणि रेड झोन मधील व्यक्ती दुसऱ्याठिकाणी जाऊ शकत नाही असे सांगितले. बिजनौर पासून वधू छायाचे गाव जसपूर १५० किमीवर असून ते उत्तराखंड मध्ये आहे. तेथे ग्रीन झोन आहे.

सीमेवर अडविल्याची खबर अरविंदने वधूच्या घरी देताच छाया, तिचे आईवडील आणि पुरोहित धर्मपूर पिकेट पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले. इकडे अरविंदसुद्धा पुरोहित घेऊन या सीमेवरील पोलीस ठाण्यात पोहोचला आणि सीमेवरच या दोघांचे लग्न लागले. पोलिसांनी या विवाहाला मुश्किलीने परवानगी दिली आणि मदतही केली. सोशल डीस्टन्सिंगचे पालन करून हा विवाह संपन्न झाला. या भागात आंतरराज्यीय विवाह नवे नाहीत पण पोलीस चौकीत विवाह होण्याची ही पहिलीच घटना आहे असे समजते.

Leave a Comment