चीनी बॅटवूमन करतेय नवीन विषाणू वर संशोधन?


फोटो साभार वॉलस्ट्रीट जर्नल
आज सर्व जगाला ग्रासलेला कोविड १९ विषाणू चीनच्या ज्या वुहान प्रयोगशाळेत तयार केला गेला असा आरोप केला जात आहे, त्याच प्रयोगशाळेत हा विषाणू जन्माला घालणारी आणि बॅटवूमन अशी ओळख असलेली चीनी वैज्ञानिक महिला शी तेन्गली पुन्हा एकदा नवा विषाणू तयार करण्यासाठी सज्ज झाली असल्याचा दावा केला जात आहे. वुहानच्या या प्रयोगशाळेत काम करणारी शी करोनाचा प्रसार झाल्यापासून जणू गुप्त झाली होती. तिला चीन सरकारने लपविले असल्याचा आरोपही केला जात होता.

शी गेली अनेक वर्षे वटवाघुळात सापडणाऱ्या विषाणूंवर संशोधन करते आहे त्यामुळे तिला बॅट वूमन असे म्हटले जाते. शी अनेक वर्षे वुहानच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी प्रयोगशाळेत काम करते आहे आणि तिनेच करोना कोविड १९ तयार केल्याचा आरोप केला जात आहे. सुरवातीला तिने वुहान प्रयोगशाळेतून हा विषाणू लिक झाल्याचा आरोप फेटाळला होता पण मार्च मध्ये करोनाची वाढत चाललेली व्याप्ती पाहून तिचा सूर बदलला आणि तिने प्रयोगशाळेतून कोविड १९ लिक झाल्याच्या बातमीने रात्रीच्या रात्री झोप न लागल्याचे म्हटले होते.

करोनावर अद्यापी लस तयार झालेली नाही आणि लॉक डाऊन मधून जग हळू हळू बाहेर येत आहे. याच परिस्थिती शी वुहान प्रयोगशाळेत पुन्हा कामावर हजर झाली असून करोनापेक्षा अधिक जीवघेणा विषाणू तयार करण्यासाठी संशोधन करत असल्याचे आरोप केले जात आहेत.

Leave a Comment