क्रिकेटबॉल चमकविण्यासाठी बनतेय विशेष मेण


फोटो साभार सिडने हेराल्ड
ऑस्ट्रेलियाच्या कुकाबुरा कंपनीने क्रिकेट बॉलवर चमक आणण्यासाठी विशेष मेण अॅप्लिकेटर बनविले असून ते लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. करोना कोविड १९ चा प्रसार ज्या माध्यमातून होतोय त्यामुळे यापुढे बॉलवर चमक राहण्यासाठी इतके दिवस खेळाडू लाळ, थुंकी, घाम यांचा वापर करत, त्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. अश्या परिस्थितीत काही तरी पर्याय हवा होता हे लक्षात घेऊन हे विशेष वॅक्स अॅप्लिकेटर बनविले गेले आहे.

पूर्वीच्या पद्धतीने चेंडूला चमक आणली गेली तर संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. मिडिया रिपोर्टनुसार आयसीसी याला काय पर्याय मिळू शकेल यावर विचार करत होती. त्यातून अश्या एखाद्या कृत्रिम पदार्थाला मंजुरी मिळू शकेल असे संकेत दिले गेले होते.

कुकाबुरा कंपनीने ही बाब लक्षात घेऊन हे वॅक्स अॅप्लिकेटर तयार केले आहे. त्यासाठी स्पंजावर मेणाचा एक विशेष थर दिला गेला असून हे खिशात सहज ठेवता येणार आहे. त्याचा वापर अंपायरच्या देखरेखीखाली करता येईल असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रेट इलियट यांनी सांगितले. ते म्हणाले याची उपयुक्तता प्रत्यक्ष वॅक्स अॅप्लिकेटरचा वापर सामना खेळताना केल्यावरच समजू शकणार आहे.

Leave a Comment