गरजेच्या वेळी या तीन पर्यायांद्वारे सहज घेऊ शकता कर्ज

कोरोना व्हायरस महामारीमुळे देशभरात मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन होते. या काळात कंपन्या, फॅक्ट्री, व्यवसाय बंद असल्याने आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत बँक अथवा गैर-बँकिंग आर्थिक कंपन्यांकडून सहज कर्ज घेता येते. जर तुमच्याकडे सोने आहे, अथवा बँकेत फिक्स्ड डिपॉजिट (एफडी), म्यूचअल फंडमध्ये गुंतवणूक असल्यास तुम्हाला कर्ज सहज मिळते. वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत यावर प्रोसेसिंग फी देखील कमी असते.

सोन्यावर कर्ज –

सोन्यावरील कर्ज अथवा गोल्ड लोनची रक्कम ही बाजारातील सोन्याच्या किंमतीवर निर्भर असते. त्यामुळे सोन्याची किंमत अधिक असल्यास, गोल्ड लोन घेणे फायदेशीर ठरते. सर्वसाधारणपणे बाजाराच्या किंमतीच्या 60 ते 80 टक्के कर्ज मिळते. मात्र जर तुम्ही कर्जाची परतफेड करू न शकल्यास सोन्यावर बँकेचा अधिकार असतो.

एफडी –

यासाठी कोणत्याही अधिक कागदपत्रांची गरज पडत नाही. बँक एफडीच्याच आधारावर पैसे देत असते. याचा तुमच्या एफडीवर कोणताही परिणाम होत नाही. एफडीच्या रक्कमेच्या 70 ते 80 टक्के कर्ज मिळते. काही बँका 90-95 टक्के कर्ज देखील देतात.

म्यूचअल फंड –

म्यूचअल फंडद्वारे बँक अथवा एनबीएफसीकडून कर्ज घेऊ शकतात. हे एक प्रकारे ओव्हरड्राफ्ट पॉलिसीप्रमाणेच आहे. फंडच्या मालकी हक्कावर देखील परिणाम होत नाही. गुंतवणूकदाराकडे फंड डिमॅट स्वरूपात असल्यास, हे काम खूपच सोपे होते.

वैयक्तिक कर्जाचा देखील एक पर्याय समोर आहे. मात्र यावर व्याजदर अधिक असते. प्रत्येक बँकेचा व्याजदर हा वेगवेगळा आहे.

Leave a Comment