स्मृती इराणींनी शेअर केला मनीष पॉलचा बॉलिवूड गाणे गातानाचा ‘हा’ व्हिडीओ

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक आपआपल्या घरात कैद आहेत. या मोकळ्या वेळेत अनेकांना आपल्यामधील कला सापडत आहे. कूकिंग, डान्सिंग पासून गाण्यांपर्यंत अनेकजण आपली कला सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दाखवत आहेत.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी असाच एक गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता मनीष बॉल गायक राघव सचर सोबत गाणे गाताना दिसत आहे. यात दोघांनी ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटातील ‘चन्ना मेरेया…’ हे गाणे गायले आहे. विशेष म्हणजे व्हिडीओ मोबाईलमध्येच रेकॉर्ड केला आहे.

स्मृती इराणी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, लॉकडाऊनने आपल्यातील व्यक्त न केलेल्या, माहित नसलेल्या क्षमता बाहेर काढल्या आहेत. असेच आनंद देणारे कॉलॅब्रिशन समोर आले आहे. असेच एक आनंद देणारे उदाहरण – ज्याने आपल्या गाण्याने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले. मनीष पॉलसोबत माझ्या आवडत्या राघव सचरसोबत.

या व्हिडीओ इस्टाग्रामवर आतापर्यंत 27 हजारांपेक्षा अधिक जणांना पाहिले आहे.  दरम्यान, स्मृती इराणी आपला लॉकडाऊनमधील वेळ इंस्टाग्रामवर गिब्रिश चॅलेंज आणि आवडती गाणे ऐकवत घालवत आहेत.

Leave a Comment