फेसबुकनंतर जिओने या कंपनीसोबत केला कोट्यावधींचा करार

काही दिवसांपुर्वीच फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्म्ससोबत मोठा करार केला आहे. आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने आणखी एक मोठा करार केला आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स आणि अमेरिकेची खाजगी इक्विटी कंपनी सिल्वर लेकमध्ये तब्बल 5,656 कोटी रुपयांचा करार झाला आहे.

या कराराविषयी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी म्हणाले की, सिल्वर लेक फर्मचा जगभरातील मोठ मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारीचा चांगला रेकॉर्ड आहे. टेक्नोलॉजी आणि फायनेंन्समध्ये सिल्वर लेक कंपनी लोकप्रिय आहे.

या कराराद्वारे सिल्वर लेकची 1.15 टक्के हिस्सेदारी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये असेल. सोबतच या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी वॅल्यू 4.90 लाख कोटी रुपये आणि एंटरप्रायझेस वॅल्यू 5.15 लाख कोटी रुपये झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच जिओ प्लॅटफॉर्म्सने फेसबुकसोबत 43,574 कोटी रुपयांचा करार केला आहे.

Leave a Comment