इरफान-नवाजुद्दीन यांचा ‘हा’ सायलेंट चित्रपट व्हायरल

अभिनेते इरफान खान यांच्या मृत्यूनंतर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी त्यांना आदरांजली वाहिली. अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी देखील इरफानसाठी खास पोस्ट शेअर केली. आता इरफान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची एक शॉर्ट फिल्म व्हायरल होत आहे.

15 मिनिटांचा बायपास हा चित्रपट व्हायरल होत आहे. हा चित्रपट पुर्ण सायलेंट आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या मित्रासोबत मिळून एका कारला लुटतात आणि कारमधील जोडप्याला मारतात. त्यानंतर दोघे जवळच जेवायला जातात व तेथे पोलीस असणाऱ्या इरफान खान यांची एंट्री होते. इरफान खान चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत आहे. दोघेही कलाकार विना डायलॉगचे डोळे आणि हावभावद्वारे कमालचे काम करताना दिसत आहेत.

या चित्रपटाला आसिफ कपाडिया यांनी प्रोड्यूस केले असून, अमित कुमार हे दिग्दर्शक आहेत.

Leave a Comment