‘या’ मेसेज-ईमेलवर करू नका क्लिक, आयकर विभागाने केले सावध

सरकार सायबर हल्ल्यांबाबत नागरिकांना वारंवार सावध करत आहे. आता आयकर विभागाने करदात्यांना फिशिंग ईमेल आणि संदेशबाबत सावध केले आहे. करदात्यांना या प्रकारच्या ईमेलवर क्लिक न करण्यास सांगितले आहे.

आयकर विभागाने आपल्या ट्विटमध्ये एका मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात लिहिले आहे की कोरोना व्हायरसमुळे सरकारने सर्व करदात्यांना रिफंड देण्याचा निर्णय घेतला आहे. या कठीण स्थितीमध्ये मदत मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करा. आयकर विभागने या प्रकारचे मेसेज आणि ईमेलपासून सावध राहण्यास सांगितले आहे. रिफंडचा दावा करणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. हे मेसेज आयकर विभागाकडून पाठवण्यात आलेले नाही, असे विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार 8 ते 20 एप्रिल या काळात विभागाने विविध श्रेणीतील करदात्यांना 9 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे 14 लाख रिफंड जारी केले आहेत. यात हिंदू अविभाजित कुटुंब, प्रॉपरायटर, फर्म, कॉर्पोरेटर, स्टार्टअप्स आणि लघू-मध्य उपक्रम श्रेणीतील करदात्यांचा समावेश आहे.

याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित रिफंड लवकरात लवकर जारी केले जातील. ज्याचा फायदा 14 लाख करदात्यांना होईल.

Leave a Comment