आता थेट कॉलद्वारे होणार कोव्हिड-19 ची ट्रेसिंग

सरकार टेलिकॉम कंपन्या व्होडाफोन-आयडिया, रिलायन्स जिओ, एअरटेलसोबत मिळून देशभरात कोव्हिड-19 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणार आहे. यासाठी सरकारकडून तुम्हाला कॉल येऊ शकतो व कोव्हिड-19 च्या लक्षणांबाबत विचारले जाऊ शकते.

ईटीच्या रिपोर्टनुसार, सरकारकडून 900 मिलियन लोकांना फोन करून कोरोना व्हायरसच्या लक्षणांबाबत विचारले जाऊ शकते. ज्यांच्याकडे आरोग्य सेतू अ‍ॅप आहे व फीचर फोन आहे, त्यांना फोन येऊ शकतो. सरकार यासाठी टेलिकॉम कंपन्यांसोबत मिळून काम करेल. कॉलद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगशिवाय सरकार आरोग्य सेतू अ‍ॅपला 550 मिलियन फीचर फोनमध्ये एक्सपँड करू शकते.

याबाबत मायगव्हचे सीईओ अभिषेक सिंघ यांनी ईटीला सांगितले की, वॉइस कॉल भारतीय भाषांमध्ये केले जातील. यासाठी आयव्हीआरएस असेल, जो युजर्सशी संवाद साधेल. हे ऑटोमॅटेड कॉल सारखे असू शकते. जर एखाद्या युजर्सला कोरोनाची लक्षणे असतील तर स्थानिक अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली जाईल. याशिवाय ज्या युजर्सनी आरोग्य सेतू अ‍ॅपला डाऊनलोड केले नाही, त्यांना डाऊनलोड करण्यासाठी नॉटिफिकेशन पाठवले जाईल.

Leave a Comment