कोरोना : ही टेनिसपटू चक्क डिनर डेटद्वारे गोळा करणार मदत निधी

कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन आहे. क्रिडास्पर्धा देखील रद्द झाल्या असल्याने, खेळाडू कुटुंबांसोबत वेळ घालवत आहेत. सोबतच अनेक खेळाडू कोरोना व्हायरसच्या लढाईत मदत करत आहेत. आता कॅनडाची टेनिसपटू यूजनी बूचार्डने कोरोना व्हायरसच्या लढाईत मदत करण्यासाठी हटके पाऊल उचलले आहे.

यूजनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने माहिती दिली की कोरोनाच्या विरोधात निधी जमा करण्यासाठी चॅरिटी करणार आहे. यासाठी यूजनी सर्वाधिक बोली लावणाऱ्या चाहत्यासोबत डिनर डेटवर जाणार आहे. याद्वारे जे पैसे येतील ते सर्व कोरोना व्हायरसच्या लढ्यात देण्यात येतील.

तिने सांगितले की, ती ऑल इन चॅलेंज अंतर्गत असे करेल. आतापर्यंत चाहत्यांनी 16 लाखांपर्यंतची बोली लावली आहे.  दरम्यान, यूजनीची सध्याची रँकिंग 332 असून, 2014 साली ती विंम्बलडनच्या अंतिम सामन्यात देखील पोहचली होती.

Leave a Comment