आफ्रिकी देश चीनवर नाराज, भारताला मोठी संधी

वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरल्यानंतर चीन सर्वच देशांच्या निशाण्यावर आले आहे. अमेरिका वारंवार यावरून चीनवर टीका करत आहे. तर आता आफ्रिकेतील देश चीनवर वर्णभेदी असल्याचा आरोप करत आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरस रोखण्यासाठी चीनने कठोर पावले उचलली आहेत. चीनवर आरोप आहे की त्यांनी अनेक आफ्रिकन नागरिकांना त्यांच्या हॉटेल व घरातून बाहेर काढले.

चीनच्या या पावलामुळे आफ्रिकेतील देशांनी चीनवर टीका केली आहे. मात्र तज्ञांच्या मते यामुळे भारताचा फायदा होऊ शकतो. चीनप्रमाणेच भारताच्या देखील आफ्रिकी देशांमध्ये महत्त्वाकांक्षा आहेत. मात्र आतापर्यंतच चीनची तेथे मजबूत पकड होती.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, इंटरनॅशनल रिलेशन्स सोसायटी ऑफ केनियाचे सचिव आणि सीईओ डॉक्टर पीटर एमवेंचा म्हणाले की, भारत आणि चीनला आफ्रिकेत दबाव बनवायचा आहे. वर्ष 2001 मध्ये भारताचा आफ्रिकेत 5.3 अब्ज डॉलरचा व्यापार होता, जो 2018 मध्ये 75 अब्ज डॉलर झाला आहे. आता भारत आफ्रिकेतील चौथा सर्वात मोठा भागीदार आहे. भारत या देशांमध्ये औषध आणि पेट्रोलियम उत्पादनांचे निर्यात करते. तर दुसरीकडे चीनचा आफ्रिकेतील देशांसोबतच व्यापार 200 अब्ज डॉलरचा आहे. जवळपास 30 लाख भारतीय वंशाचे नागरिक आफ्रिकेत राहतात. याद्वारे भारताला आपला व्यापार वाढविण्यास मदत होईल.

तज्ञांचे म्हणणे आहे की, चीन आफ्रिकेत आपली प्रतिमा सुधारण्यास अपयशी ठरल्यास भारत तेथील वैद्यकीय बाजारात मजबूत स्थिती निर्माण करू शकतो. नायझेरिया, दक्षिण आफ्रिका, केनिया आणि मोझाम्बिक मोठे व्यापारी भागीदार आहेत.

Leave a Comment