अ‍ॅपल स्मार्टवॉचने पुन्हा एकदा वाचवले वृद्ध महिलेचे प्राण

अ‍ॅपल स्मार्टवॉचमुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अ‍ॅपल स्मार्टवॉचने 80 वर्षीय महिलेचे प्राण वाचवले आहेत. हॉस्पिटलमध्ये महिलेचा ईसीजी रिपोर्ट सामान्य आल्यानंतर महिलेला पुर्णपणे फिट असल्याचे सांगण्यात आले होते. सामान्य रिपोर्ट आल्यानंतर महिलेला अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी अ‍ॅपल स्मार्टवॉचच्या इनबिल्ट ईसीजीची मदत घेण्यात आली व रिपोर्ट पुन्हा तपासण्यात आला. यावेळी रिपोर्टमध्ये गंभीर आजार असल्याचे समोर आले.

यानंतर महिलेला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व अ‍ॅपल स्मार्टवॉचच्या रिपोर्ट दाखवण्यात आली. ज्यात कोरोनरी (ह्रदयासंबंधी आजार) आजार असल्याचे संकेत होते. आजाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.

वॉचबाबत कार्डियोलॉजिस्ट म्हणाले की, स्मार्ट टेक्नोलॉजीमुळे नवीन शक्यतांचा रस्ता उघडतो. अ‍ॅपल वॉच केवळ आट्रियल फिब्रिलेशन किंवा आटरियोवेन्ट्राइक्यूलर-कंडक्शन डिस्टर्बेशनलाच डिटेक्ट करत नाही तर मायोकार्डियलची देखील माहिती देते.

वॉचमधील ईसीजी फीचर जगभरातील लोकांचे प्राण वाचवत असताना, सीरिज 6 यापेक्षाही आधुनिक आहे. या फीचर अंतर्गत पल्स ऑक्सीमीटरची देखील माहिती दिली जाते. याद्वारे रुग्णाच्या ऑक्सिजन सॅच्युरेशनच्या लेव्हलची माहिती घेऊन फुफ्फुसाच्या आजाराची माहिती देते.

Leave a Comment