आनंद महिंद्रांना का प्रेरणादायी वाटतो हा 2 चाकी ट्रॅक्टरचा व्हिडीओ

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या फॉलोअर्ससाठी ते वेगवेगळे प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करत असतात. आता महिंद्रांनी ट्विटरवर असाच एक व्हिडीओ शेअर करत, अर्थव्यवस्था कशी संतुलित करता येईल हे सांगितले आहे.

महिंद्रांनी एका ट्रॅक्टरचालकाचा व्हिडीओ शेअर केला असून, जो केवळ दोन चाकांच्या आधारावर संतुलन बनवत ट्रॅक्टर चालवत आहे. हा व्हिडीओ शेअर करत महिंद्रांनी लिहिले की, हे नक्कीच रोडच्या नियमांचे उल्लंघन आहे. मात्र सोमवारच्या सकाळी मी या फोटोला आशा म्हणून पाहत आहे. कारण दोन चाकांशिवाय कदाचित आपण आपल्या अर्थव्यवस्थेला संतुलन बनवत पुढे नेण्यासाठी रस्ता शोधू शकतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Leave a Comment