आर्टिफिशियल इंटेलिजेंस करणार लवकर ग्लूकोमाचे निदान करण्यास मदत

संशोधकांनी सध्याच्या पद्धतीपेक्षा 18 महिने आधी ग्लूकोमाची (काचबिंदू) माहिती देणारी आर्टिफिशियल इंटिलिजेंसवर आधारित नवीन चाचणी शोधली आहे. या संबंधींचा रिसर्च जर्नल एक्सपर्ट रिव्ह्यू ऑफ मोलेक्यूलर डायग्नोस्टिक्समध्ये प्रकाशित झाला आहे.

या रिसर्चरचे प्रमुख संशोधक प्रोफेसर फ्रान्सेस्का कार्डेईरो म्हणाले की, आम्ही जलद, स्वयंचलित आणि अत्यंत संवेदनशील अशी पद्धत शोधली आहे, जी कोणाला ग्लूकोमाद्वारे आंधळेपण येण्याची शक्यता आहे त्याची लवकर माहिती देते.

या चाचणीला डार्क (Detection of Apoptosing Retinal Cells) म्हटले जाते. यात रक्तप्रवाहात इंजेक्शन दिले जाते, जे रेटिना पेशी आणि अपॉप्टोसिसला प्रकाशित करते. मृत पेशी यावेळी अधिक पांढऱ्या दिसतात. जेवढ्या या पेशी अधिक असतील तेवढा डार्क काउंट अधिक असतो. या चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी झालेल्यांनी 60 टक्के लोकांनी आर्टिफिशिलय इंटेलिजेंसचा (एआय) आधार घेतला. एआयला आधी रेटिनल स्कॅन्ससाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

चाचणीमध्ये संशोधकांना आढळले की, सध्याच्या गोल्ड स्टँडर्ड ओसीटी रेटिनल इमेजिंग टेक्नोलॉजीच्या तुलनेत ही चाचणी 18 महिने आधी ग्लूकोमाची माहिती देते. यामुळे ग्लूकोमाचे लवकर निदान करणे शक्य होणार आहे व यामुळे लोकांची दृष्टी कायम राहण्यास मदत होईल.

Leave a Comment