महिलांसाठी आहार

महिला आणि पुरुषांसाठी आहार वेगळा असावा का, असा प्रश्‍न कोणी विचारला तर तो कोणाला हास्यापद वाटू शकेल. कारण शेवटी आहार तो आहार. तो महिलांसाठी वेगळा कसा असेल? मात्र महिलांच्या शरीराची रचना आणि त्यांची प्रतिकार शक्ती त्याचबरोबर खाल्लेल्या अन्नाला प्रतिसाद देण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी पुरुषांपेक्षा वेगळ्याच असतात. म्हणून पुरुषांच्या आणि महिलांच्या आहारात थोडासा ङ्गरक असला पाहिजे. अर्थात त्यामुळे घरामध्ये पुरुषांचा स्वयंपाक वेगळा करावा आणि बायकांचा स्वयंपाक वेगळा करावा, असे काही कोणी म्हणणार नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. मग महिलांचा आहार वेगळा असावा म्हणजे काय? तर घरातल्या सगळ्यांचा आहार सारखा असावा, मात्र त्या आहारातले काही खाद्य पदार्थ महिलांनी आवर्जून आणि काहीशा अधिक प्रमाणात खाल्ले पाहिजेत.

एकच आहार महिला आणि पुरुषांनी घेतला तरी त्या आहाराचे महिलांवर होणारे परिणाम पुरुषांपेक्षा थोडे वेगळे असतील. महिलांसाठी काही आहारतज्ज्ञांनी खालीलप्रमाणे आहार सुचवलेला आहे. १) दूध – तसे दूध तर सर्वांनीच पिले पाहिजे. परंतु महिलांनी आवर्जून प्यावे. कारण ते महिलांच्या आरोग्याला अधिक उपयुक्त असते. दूध हा कॅल्शियमचा पुरवठा करणारा स्रोत असतो. त्याशिवाय त्यामध्ये रिबोफ्लेरीन, व्हिटॅमीन बी-१२ आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते. दुधाचे आरोग्यावर होणारे उपयुक्त परिणाम अनेकविध आहे. कारण त्यामध्ये व्हिटॅमीन सी आणि आयर्न (लोह) ही दोन पोषक द्रव्ये वगळता बहुतेक सगळी पोषण द्रव्ये असतात. चमकदार त्वचा, मजबूत हाडे, मजबूत दात आणि वजन नियंत्रित ठेवण्या साठी दूध उपयुक्त ठरते.

हृदयविकाराला प्रतिबंध करणारे आणि कर्करोगाला मज्जाव हेही दुधाचे दोन गुणधर्म उल्लेखनीय असतात. विशेषत: महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते आणि दूध पिल्याने ती शक्यता कमी होते. महिलांमध्ये पचनाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यातूनच मधुमेह आणि हृदयविकाराची शक्यता वाढते. म्हणून महिलांनी न सडलेल्या दाळी आणि तांदूळ यांचा वापर आहारात जरूर करावा. कारण न सडलेल्या या धान्याच्या टरङ्गलांमध्ये ङ्गायबर आणि काही जीवनसत्वे असतात. म्हणून सालीसहीत मुगाची दाळ शक्यतो वापरावे. महिलांच्या खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या अतीशय आवश्यक आहेत. त्यांना महिलांच्या आहारातील सुपर ङ्गूडस् असे म्हणतात. कारण त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम चांगले असतात.

कोबी, फ्लॉवर, मेथी अशा भाज्या आपण खातच असतो, परंतु आपल्याला निसर्गाने इतर अनेक पालेभाज्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या शहरात मिळत नाहीत. ग्रामीण भागात मात्र घोळ, चुका, अंबाडी, राजगिरा अशा किती तरी पालेभाज्या मिळत असतात. त्या प्राप्त करून त्यांचा अंतर्भाव महिलांनी आपल्या खाण्यात जरूर केला पाहिजे. या पालेभाज्यांमुळे ङ्गायबर, पॉलिथेनॉल, ब जीवनसत्व, अ आणि क जीवनसत्व विपुल मिळत असते. थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे तर हिरव्या पालेभाज्या हा आरोग्याचा झरा आहे.

चेहरा तुकतुकीत आणि प्रसन्न दिसण्यासाठी करावयाचे ते प्रसाधनच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. शाबुदाणा, बटाटे, शेंगादाणे, वांगे असे वातूळ पदार्थ कमी आणि पालेभाज्या अधिक अशी जर अन्नाची विभागणी केली तर आरोग्यास उपकारक ठरते. चार घास जास्त खाल्ले तरी वजन वाढत नाही. महिलांच्या खाण्यामध्ये क जीवनसत्व आणि आयर्न त्याचबरोबर कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेले अन्न आवर्जून समाविष्ट केले जावे. पण त्याचबरोबर पाण्याचेही महत्व ओळखले पाहिजे. कारण शेवटी आपल्या शरीरामध्ये ७५ टक्के पाणी आणि २५ टक्के घन घटक असतात. शरीरातल्या चयापचय क्रिया व्यवस्थित चालवण्यास पाण्याचा वाटा मोठा असतो. त्यामुळे दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे वजन कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment