गुगल सर्चवर हनुमान चालीसाचा हंगामा


फोटो साभार पिंटरेस्ट
करोनामुळे भारतात मार्च २५ पासून सुरु झालेल्या लॉक डाऊनची आता तिसरी फेज सुरु असताना गुगलवर हनुमान चालीसा सर्च करणाऱ्याची संख्या प्रचंड वेगाने वाढली असल्याचे दिसून आले आहे. गुगल हे सर्च इंजिन आहे आणि त्यावर केल्या जात असलेल्या ऑनलाईन सर्चवर गुगल कडून मॉनीटरिंग केले जाते. इतकेच नव्हे तर गुगल ट्रेंड युट्यूबवर होत असलेल्या सर्चवर सुद्धा मॉनीटरिंग करते.

८ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी झाली पण लॉक डाऊन मुळे देशातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे भाविक घरातच पूजा पाठ करण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे हनुमान चालीसावर सर्च होण्याचे प्रमाण एकदम वाढले आहे. गुगल, सर्च साठी ० ते १०० असे रेटिंग देते. ५ ते ११ एप्रिल या काळात हनुमान चालीसाने सर्च संदर्भात १०० रेटिंग मिळविले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जनता कर्फ्यू पुकारला गेला तेव्हा म्हणजे २१ मार्च रोजी हनुमान चालीसाचा सर्च एकदम नेहमीप्रमाणे होता मात्र २५ मार्च पासून त्याने वेग पकडला आणि ५ ते ११ एप्रिल मध्ये त्याने १०० चे रेटिंग मिळविले.

युट्यूबवरही हनुमान चालीसाचा सर्च २२ मार्च ते ११ एप्रिल या काळात प्रचंड वेगाने वाढला. टी सिरीजच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर हनुमान चालीसा सुमारे ९६ लाख लोकांनी पहिल्याचेही दिसून आले आहे.

Leave a Comment