एका अटीवर मुरलीची डिनर डेट स्वीकारणार पेरी


फोटो साभार नवभारत टाईम्स
भारताचा सलामी फलंदाज मुरली विजय याने गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिसा पेरी बरोबर डिनर डेटला जायला आवडेल असे सांगितले होते. विशेष म्हणजे एलिसाने मुरलीचे हे आमंत्रण स्वीकारण्याची तयारी दाखविली असून त्यासाठी एक अट घातली आहे. जेवणाचे बिल मुरली देणार असेल तर पेरीला ही डेट स्वीकारायला आवडेल असे तिने सोनी स्पोर्ट्सवर घेतल्या गेलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे मुरलीने चेन्नई सुपर किंग्स लाईव्ह चॅट मध्ये, त्याला तुला कुणा दोघांना डिनर डेट साठी न्यायला आवडेल असा प्रश्न केला गेला तेव्हा शिखर धवन आणि ऑस्टेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसा पेरीचे नाव घेतले. पेरी खुपच सुंदर आहे असेही मुरली यावेळी म्हणाला पण प्रत्यक्षात पेरीला याची काहीच कल्पना नव्हती. तिला जेव्हा सोनी स्पोर्ट्सवरील मुलाखतीत मुरली काय म्हणाला हे सांगितले गेले आणि त्यावर तुझे उत्तर काय असे विचारले गेले तेव्हा तिने हसतहसत एका अटीवर हे आमंत्रण स्वीकारण्याचा विचार करेन असे सांगितले. मुरलीने तिचे केलेले कौतुक ऐकून आनंद झाल्याचेही ती म्हणाली. पेरीची गणना जगातील सुंदर महिला स्पोर्ट्स स्टार मध्ये केली जाते.

Leave a Comment