शाओमी करत आहे का युजर्सचा खाजगी डेटा चोरी?

शाओमी स्मार्टफोन युजर्सचा डेटा लीक होत असल्याची माहिती समोर आली आहे. खासकरून एमआय ब्राउजरद्वारे युजर्सचा डेटा चोरी केला जात आहे. फॉर्ब्सच्या रिपोर्टनुसार, शाओमी युजर्सच्या फोनवर करण्याच आलेली सर्व अ‍ॅक्टिव्हिटी कंपनी रेकॉर्ड करते आणि डाटा चीनमध्ये स्टोर केले जाते.

मात्र यावर स्पष्टीकरण देत शाओमीचे वॉइस प्रेसिडेंट मनू कुमार जैन यांनी सांगितले की, युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांचा डेटा कलेक्ट केला जात नाही. एमआय ब्राउजर आणि सर्व एमआय इंटरनेट प्रोडक्ट पुर्णपणे सुरक्षित आहेत व भारतातीलच लोकल सर्व्हरमध्ये डेटा स्टोर केला जात आहे.

फॉर्ब्स व्यतिरिक्त सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट अँड्रूय टिरने यांनी ट्विटर हँडलवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात शाओमी स्मार्टफोन्स कशाप्रकारे Incognito Mode मध्ये देखील युजर्सचा डेटा कशाप्रकारे कलेक्ट करत आहे, ते दाखवले आहे.

फॉर्ब्सच्या रिपोर्टनुसार, सायबर सिक्युरिटी तज्ञ सिरलीगने रेडमी नोट 8 वर याचे टेस्टिंग केले आहे. यात आढळले की स्मार्टफोनवर ब्राउज करण्यात आलेला डेटा चीनमधील अलीबाबाच्या डेटा सर्व्हरवर स्टोर होत आहे. अलीबाबा एक क्लाउड कंपनी आहे, ज्याचे सर्व्हर शाओमी घेते. शाओमीच्या फोनमध्ये येणाऱ्या एमआय ब्राउजरवर सर्च करण्यात आलेल्या प्रत्येक वेबसाईटचा डाटा स्टोर केला जात आहे. शाओमीच्या डिव्हाईसमध्ये अ‍ॅक्सेस करण्यात आलेल्या फोल्डरचा डेटा देखील स्टोर केला जात आहे. स्क्रीन स्वाइप आणि स्टेट्स बारद्वारे अ‍ॅक्सेस डाटा देखील स्टोर केला जात आहे.

हा रिपोर्ट समोर आल्यानंतर शाओमीचे वॉइस प्रेसिडेंट मनू कुमार जैन यांनी व्हिडीओ जारी करत ही माहिती खोटी असून, शाओमीचा स्मार्टफोन आणि एमआय ब्राउजर पुर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, युजर्सला घाबरण्याची गरज नाही. प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय थर्ड कंपनी आणि संस्था ट्रस्टअर्क व ब्रिटिश स्टँडर्ड इंस्टिट्यूशनने शाओमी स्मार्टफोन्सने सिक्युरिटी आणि प्रायव्हेसी प्रॅक्टिसला सर्टिफाय केले आहे. ज्यात एमआय अॅप्स आणि ब्राउजर्सचा देखील समावेश आहे.

Leave a Comment