Video : कोरोना वॉरिअर्सना वायु दलाकडून अनोखी मानवंदना


नवी दिल्ली – देशभरातील असंख्य डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि प्रसारमाध्यमे कोरोना व्हायरसविरोधात आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या कोरोना वॉरिअर्सना भारतीय सेनेच्या तिन्ही दलाकडून अनोख्या अंदाजात सलामी दिली जात आहे. हा कार्यक्रम आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत पार पडला.


सुखोईसारख्या लढावू विमानांनी कोलकाता, मुंबई आणि दिल्लीसारख्या देशातील वेगवेगळ्या शहरात भारतीय हवाईदलाकडून कोरोना रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करत आहे. या रुग्णालयांजवळ भारतीय लष्कराचे बॅन्ड कोरोना वॉरिअर्सचे मनोबल वाढवणार आहेत. तर भारतीय नौदल आपल्या युद्धनौका दिव्यांनी उजळवत कोरोना योद्धांना सलामी देणार आहे.


भारतीय हवाई दलाने कोरोना वॉरिअर्सप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फ्लाय पास्ट केले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरातचे कच्छ असे दोन फ्लायपास्ट एअर फोर्सकडून करण्यात आले. सुखोईसारखी भारताची अत्याधुनिक फायटर विमाने, ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्टचा यामध्ये समावेश होता. भारतीय नौदलांकडूनही समुद्रात कोरोना वॉरिअर्सना सलामी देण्यात आली.

Leave a Comment