पाकिस्तानी शोमध्ये श्रीदेवी-इरफान यांच्या मृत्यूची उडवली खिल्ली, लोकांची बॉयकॉटची मागणी

एका पाकिस्तानी कार्यक्रमात दिवंगत बॉलिवूड अभिनेते इरफान खान आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची खिल्ली उडवणे अँकर आमिर लियाकतला चांगलेच महागात पडले आहे. कार्यक्रमात पाहुणे म्हणून पोहचलेले अभिनेते अदनान सिद्दीकी यांच्या समोर लियाकतने त्यांच्या मृत्यूची खिल्ली उडवली होती. आता या प्रकरणावरून सिद्दीकी यांना माफी मागावी लागली आहे.

माफीने देखील प्रकरण शांत झाले नसून, सोशल मीडियावर नेटकरी या कार्यक्रमाच्या बंदीची मागणी करत आहेत.

या कार्यक्रमा दरम्यान अँकर आमिर लियाकत म्हणाला की, अदनानने राणी मुखर्जी आणि बिपाशा बासू यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. या कारणामुळे त्या दोघी वाचल्या. तर इरफान यांच्यासोबत ‘अ मायटी हार्ट’ आणि श्रीदेवी यांच्यासोबत ‘मॉम’ चित्रपटात काम केल्याने त्यांचे निधन झाले.

https://twitter.com/arsalanahmedk/status/1256361269252313090

यावर नेटकऱ्यांनी या कार्यक्रमाच्या बंदीची मागणी केली आहे. तर काहींनी अँकरचे वर्तन असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे.

याबाबत अदनान यांनी ट्विट केले की, अँकर आमिर लियाकतने इरफान खान आणि श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत खिल्ली उडवली. एक व्यक्ती म्हणून ते दोघेही माझ्या खूप जवळ होते. त्यामुळे अँकरचे वर्तन चुकीचे होते. निधन झालेल्या या दोन व्यक्तींच्या बाबत अशी मस्करी करणे द्वेषपुर्ण आहे. असे करणे केवळ त्यांचीच प्रतिमा दाखवत नाहीतर, माझे आणि माझ्या देशाची प्रतिमा देखील खराब होते.

Leave a Comment