गीतेतील श्लोकाद्वारे इरफान खानला पाउलो कोएल्हो यांची अनोखी श्रद्धांजली

अभिनेते इरफान खान यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील इरफान यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.

जगप्रसिद्ध लेखक पाउलो कोएल्हो यांनी देखील इरफान खान यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी गीतेतील श्लोकाद्वारे इरफान यांना श्रद्धांजली वाहिली.

पाऊलो कोएल्हो यांनी ट्विट केले की, एक तारा आकाशातील इतर ताऱ्यांमध्ये सहभागी झाला. धन्यवाद इरफान खान.

जे जन्माला आले आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. ज्याचा मृत्यू झाला आहे, त्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे. जे अपरिहार्य आहे त्यासाठी दु: खी होऊ नये, या भगवत गीतेच्या श्लोकाद्वारे त्यांनी इरफान खान श्रद्धांजली वाहिली.

भगवत गीता वाचली आहे का ? असा प्रश्न एका युजरने विचारल्यावर पाउलो कोएल्हो म्हणाले की, मी या पुस्तकावर आधारित गाणे लिहिले आहे.

Leave a Comment