महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची तहसिलदाराला मारहाण


सांगली : तहसिलदाराला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली असून विटा पोलिसांत चंद्रहार पाटील यांच्याविरुद्ध या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विटा येथील तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी चंद्रहार पाटील यांच्या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करत साडेसात लाखांचा दंड ठोठावला होता. चंद्रहार पाटील हे मागील काही दिवसांपासून तहसिलदारांकडे या वाळूच्या गाड्यांवर केलेला दंड कमी करा, अशी मागणी करत होते. पण, सर्व दंड भरावाच लागेल, अशी सूचना तहसीलदार यांनी दिली होती. चंद्रहार पाटील आणि त्यांच्या एका साथीदाराने याचा राग मनात धरून तहसिल कार्यालयाच्या आवारातच तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना बेदम मारहाण केली. तहसीलदारांना यात गंभीर दुखापत झाली आहे. खुद्द तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी याप्रकरणी विटा पोलीस स्टेशनमध्ये चंद्रहार पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील कारवाई करत आहे.

Leave a Comment