ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन होऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. आपल्या आवडत्या स्टारच्या जाण्यामुळे चाहते अजूनही दु:खात आहेत. पण या दरम्यान, रणधीर कपूर यांची मुलगी आणि त्यांची पुतणी करीना कपूरने सोशल मीडियावर सैफ आणि तैमूरचा एक फोटो शेअर केला आहे.आता त्या फोटोत काहीही चुकीचे नसले तरी करिनाला वेळ पाहून तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.
करीनाने शेअर केला तैमुरचा फोटो, नेटकऱ्यांनी करुन दिली ऋषी कपूर यांची आठवण
करीना कपूरने इंस्टाग्रामवर सैफ आणि तैमूरचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सैफ तैमूरचे केस कापत आहे. हा फोटो शेअर करताना करिनाने लिहिले आहे की, आणखी कोणाचे केस कापायचे आहेत का? आता सामान्य दिवसात ज्या फोटोचे लोक खूप कौतुक करतात, यावेळी ते करीना कपूरची शाळा घेत आहेत. बरेच लोक आश्चर्यचकित झाले आहेत की काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाले आहे आणि ती असा फोटो शेअर करत आहे.
एका युझरने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, आपल्या कुटुंबाचे आत्ताच किती मोठे नुकसान झाले आहे. आपण असे विनोद कसे करू शकता? त्याचवेळी दुसर्या एका वापरकर्त्यानेही याच पद्धतीने करीनाला प्रश्न विचारला. तो लिहितो- यावेळी तुम्ही उदास होऊ नये का? आपण काहीही पोस्ट करू नये. अशा प्रकारच्या कमेंट्स देऊन इतर अनेकांनी करीनाला या फोटोसाठी ट्रोल केले आहे.
दरम्यान ऋषी कपूर यांच्या निधनानंतर करीना कपूरने काही थ्रोबॅक फोटो शेअर केले होते. काही दिवसांपूर्वी करीनाने क्रिकेटर मन्सूर अली खान पटौदीसोबतचा ऋषी कपूर यांचा जुना फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करताना तिने त्या दोघांनाही वाघ असल्याचे म्हटले होते.