लॉकडाऊन इफेक्ट; चक्क पश्चिम बंगालमधून दिसत आहे जगातील तिसरे सर्वात उंच शिखर

लॉकडाऊनमुळे नागरिकांना विविध ठिकाणी प्रवास करण्यावर बंदी आहे. मात्र असे असले तरी लॉकडाऊनच्या काळात घरात बसूनच अनेकजण नैसर्गिक सुंदरतेचा अनुभव घेत आहे. लॉकडाऊनमुळे प्रदुषणाच्या प्रमाण कमी झाल्याने आता विविध शहरातून हिमालयाच्या पर्वत रांगा दिसत आहे. या सुंदर दृश्यांचे फोटो नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशमधून हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा दिसत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथून जगातील तिसरे सर्वात उंच शिखर कांचनजंगा दिसत असल्याचे फोटो नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत. येथून पुर्व हिमालयातील भाग स्पष्ट दिसत आहे.

ट्विटर युजर आशिष मुंधरा यांनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक युजर्सनी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Comment