लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी घेतली ‘ई-नाम’ प्लॅटफॉर्मची मदत

कृषि उत्पादनांसाठी 2016 मध्ये ई-नाम नावाने ई-कॉमर्स वेबसाईट आणि अ‍ॅपची सुरूवात करण्यात आली होती. आता लॉकडाऊनमुळे सर्व मार्केट बंद असल्याने 200 नवीन कृषि बाजार आणि मंडईंना जोडण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे या प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढली आहे.

कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, देशभरात 1 लाख 66 हजार नोंदणीकृत शेतकरी घरूनच आपल्या उत्पादनांची विक्री करू शकतील व सोबतच सोशल डिस्टेंसिंगचे देखील पालन होईल.

देशातील 1500 प्रमुख फार्म अँड कमोडिटी बाजार आता ई-नामवर उपलब्ध असल्याची माहिती तोमर यांनी दिली. किसान ई-नामच्या माध्यमातून एक लाखांपेक्षा अधिक व्यापारी जोडले जाऊ शकतील. घाऊक बाजारपेठा कोरोना व्हायरससाठी हॉटस्पॉट ठरू शकतात. कारण तेथे शेतकरी, छोटे व्यापारी आणि कमीशन एजेंट उपस्थित असतात, त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी ई-नामचा वापर केला जात आहे.

ई-नाम वेबसाईट अथवा अ‍ॅपवर शेतकऱ्या आपल्या उत्पादनांच्या फोटो अपलोड करू शकतात. या नमून्यांची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी होईल. याप्रकारे शेतकऱ्यांना बाजारात येण्याची गरज नाही. हे प्लॅटफॉर्म विक्रेता-खरेदीदार अशा पद्धतीने काम करते. जेथे शेतकरी सहज उत्पादनांची विक्री करू शकतात. या प्लॅटफॉर्मवर विविध राज्यातील बाजार पेठा उपलब्ध आहेत.

Leave a Comment