फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे

सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुकवर लवकरच युजर्सला लाईव्ह व्हिडीओज पाहण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कोरोना व्हायरस महामारीच्या काळात परफॉर्मिंग आर्ट्सशी संबंधी लोकांची मदत करण्यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.

फेसबुक युजर्स लाईव्ह ब्रॉडकास्ट सुरू करण्याआधी ठरवू शकतील की त्यांना लाईव्ह व्हिडीओ मोफत ठेवायचा आहे की इतर युजर्सकडून पाहण्यासाठी शुल्क घ्यायचे आहेत.

संगीतकार, कॉमेडियन्स, पर्सनल ट्रेनर आणि स्पीकर्स संबंधीत लोक लॉकडाऊनच्या काळात आपली कला सादर करू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांसाठी हे खास फीचर आणण्यात आले आहे. चॅरिटीसाठी फंड जमा करण्याचा विचार करणाऱ्यारे देखील व्हिडीओ स्ट्रिम्सद्वारे निधी जमा करू शकतील. असे युजर्स लाईव्ह स्ट्रिममध्ये डोनेड बटनचा समावेश करू शकतील. डोनेट पर्यायाद्वारे जमा झालेली संपुर्ण रक्कम फेसबुक थेट नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या अकाउंटमध्ये पाठवेल.

आपल्या स्ट्रिमिंग सर्व्हिसला अधिक चांगले करण्यासाठी फेसबुक छोटे-मोठे बदल करत आहे.

Leave a Comment