ब्रावो बनविणार धोनीच्या जीवनावर हे स्पेशल गाणे

चेन्नई सुपर किंग्सचा ऑलराउंडर खेळाडू ड्वेन ब्राओने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसाठी लवकरच एक खास गाणे आणणार असल्याची माहिती दिली आहे. ड्वेन ब्रावो आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी यांनी इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन केले, यावेळेस त्याने हा खुलासा केला.

लाईव्ह चॅटदरम्यान सनीने त्याच्या नवीन गाण्याबद्दल विचारले असता, ब्रावोने सांगितले की, तो धोनीसाठी खास गाणे लिहिणार असून, या गाण्याचे नाव ‘नंबर 7’ असेल.

ब्रावोने सांगितले की, त्याचे कारकिर्द, त्याचे यश आणि त्याच्याप्रती असलेले सर्व क्रिकेटर्सचे आणि फॅन्सचे प्रेम यावर गाणे लिहिणार आहे. या गाण्याचे नाव नंबर 7 असेल.

काही दिवसांपुर्वीच ब्रावोने कोरोना व्हायरस महामारीवर ‘We not giving up’ हे गाणे लाँच केले आहे.

Leave a Comment