व्हिडीओ : चीनने अमेरिकेला ‘हा’ व्हिडीओ शेअर करत डिवचले

चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी या व्हायरसची माहिती लपवल्यावरून चीनवर टीका केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील जागतिक आरोग्य संघटनेवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. आता चीनने अमेरिकेला एका व्हिडीओच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

फ्रान्समधील चीनच्या दुतावासाने वन्स अपॉन अ व्हायरस नावाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, चीन वारंवार व्हायरसबाबत सावधान करत होते. मात्र अमेरिकेने त्याच्या दुर्लक्ष करत राहिले व नंतर उलट चीनवरच आरोप करत आहे.

हा व्हिडीओ जगभरात व्हायरल होत असून, या कार्टुन व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, चीन व्हायरसबाबत जगाला आधीपासूनच माहिती देत आहे. व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले आहे की, चीनने जानेवारीमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली होती, ज्याला अमेरिकेने मानवाधिकारांचे हनन म्हटले होते.

दरम्यान, चीनच्या विरोधात पावले उचलणार असल्याचा इशारा अमेरिकेने अनेकदा दिला आहे. चीनला दंड देण्यासाठी दीर्घकालीन योजनेवर ट्रम्प प्रशासन काम करत आहे.

Leave a Comment