देवदूत ठरलेल्या डॉक्टरांच्या नावावरून बोरिस जॉन्सन यांनी ठेवले मुलाचे नाव

ब्रिटनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे काही दिवसांपुर्वीच कोरोनातून बरे झाले आहेत. यातून बरे झाल्यानंतर त्यांना मुलगा झाल्याची देखील आनंदाची बातमी मिळाली. त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्सने लंडनमधील हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला.

आता जॉन्सन यांनी आपल्या मुलाचे नाव त्यांना कोरोनापासून वाचवणाऱ्या डॉक्टराच्या नावावरून ठेवले आहे. जॉन्सन आणि कॅरी यांनी आपले आजोबा आणि दोन डॉक्टरांच्या नावावरून मुलाचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस ठेवले आहे.

सोशल मीडियावर याबाबतची माहिती देताना कैरी यांनी सांगितले की, मुलाचे नाव आजोबा लॅरी, जॉन्सनचे आजोबा विल्फ्रेड आणि मागील महिन्यात जॉन्स यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर निक प्राइस आणि निक हार्ट यांच्या नावावरून निकोलस असे ठेवण्यात आले आहे.

मुलाच्या नावाची घोषणा करताना सायमंड्स यांनी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले.

Leave a Comment