40 वर्षांपासून धूळ खात पडलेल्या मर्सिडीजची एवढ्या कोटींना झाली विक्री

40 वर्षांपासून गोदामात पडून असलेल्या एका दुर्मिळ मर्सिडीजची तब्बल 1.1 मिलियन डॉलर्सला (8.30 कोटी रुपये) विक्री झाली आहे. ही 1960 च्या दशकातील 300एसएल रोडस्टर असून, क्लासिक कार कलेक्शनमध्ये ही सर्वात लोकप्रिय कार पैकी एक आहे. अमेरिकेतील इंडियाना येथे ही कार अनेक वर्ष गोदामात पडून होती.

याआधी मर्सिडीज रोडस्टरला आधीच्या मालकाने 1976 मध्ये खरेदी केले होते. तेव्हापासून ही कार 4 दशके एकाच जाग्यावर आहे. ओडोमीटरवर या कारचा प्रवास 24 किमी पेक्षा किमी दाखवत आहे.

Image Credited – businessinsider

कार विक्री केलेल्या डीलरशीपनुसार, 1960 मध्ये केवळ 249 अशा 300एसएल रोडस्टर्सची निर्मिती करण्यात आली होती. तर 1957 ते 1963 दरम्यान मर्सिडीजने केवळ 1,848 रोडस्टर्सचे उत्पादन केले होते.

या कारला पुन्हा पुर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी मालकाला अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. याचे इंजिन देखील पुर्ण रिबिल्ड करावे लागणार आहे. या कारचे इंटेरियर काळ्या रंगाचे आहे.

Image Credited – businessinsider

गुलविंग मोटार कार्सनुसार, कारच्या ड्रॉप टॉपचे एक्सटेरियरला सोनेरी रंग देण्यात आला होता. कारला निर्मित्याचे डाटा कार्डसोबत विकण्यात आले आहे. ज्यात कारची माहिती आहे.

ही कार आपल्या मूळ स्थिती असल्यानेच या कारला एवढी किंमत मिळाली. सोबतच 40 वर्ष या कारचा वापरच करण्यात आलेला नाही.

Leave a Comment