यामुळे शाळेच्या बसचा रंग असतो पिवळा


आपल्या पैकी अनेकांनी शाळेची बस नक्कीच पाहिली असेल यात काही शंका नाही. पण तुम्ही कधीही असा विचार केला आहे का शाळेच्या या बसचा रंग पिवळाच का असतो? दुसरा कोणताही रंग या बसना का नसतो? तर आम्ही आज तुम्हाला या मागचे कारण सांगणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला त्यामागची पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया…

उत्तर अमेरिकेत १९व्या शतकात सर्वातआधी स्कूल बस वापरण्यास सुरूवात केली गेली. पण त्याकाळी मोटार गाडी नसल्याने शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी घोडा गाडीचा वापर केला जात असे.

पुढे शाळेत २०व्या शतकाच्या सुरूवातीला गाडी म्हणून घोडा गाडीऐवजी मोटार गाड्यांचा वापर सुरू झाला होता. लाकूड आणि धातूपासून ही गाडी तयार केलेली असायची. तर केशरी किंवा पिवळा रंग या गाड्यांना दिलेला असायचा. जेणेकरून या गाड्यांमध्ये वेगळ्या दिसून याव्यात.

१९३९ पासून उत्तर अमेरिकेत स्कूल बसेसना अधिकृतपणे पिवळा रंग देण्याची सुरूवात झाली होती. भारत, अमेरिका आणि कॅनडासहीत जगभरातील अनेक देशातील स्कूल बसेस या पिवळ्या रंगाच्याच असतात. हा रंग आता या गाड्यांची ओळख बनला आहे.

स्कूल बसेसबाबत अनेक दिशा-निर्देश सर्वोच्च न्यायालयाने देखील जारी केले आहे. त्यानुसार, खाजगी स्कूल बसेसचा रंग पिवळाच असावा. त्यासोबतच स्कूल बसच्या पुढे आणि मागे ‘School Bus’ असा स्पष्ट उल्लेख केलेला असावा आणि जर स्कूल बस भाड्याने घेतली असेल तर ‘स्कूल बस ड्यूटी’ असे त्यावर लिहिणे गरजेचे आहे.

स्कूल बस या पिवळ्या रंगाच्या यामागे एक वैज्ञानिक आणि सुरक्षेचे कारण आहे. अमेरिकेत १९३० साली झालेल्या एका संशोधनात हे स्पष्ट झाले होते की, इतर रंगांच्या तुलनेत पिवळा रंग हा लवकर दृष्टीस पडतो. तसेच इतर रंगांमध्येही व्यक्तीचे लक्ष पिवळ्या रंगावर आधी जाते. वैज्ञानिकांनुसार, इतर रंगाच्या तुलनेत पिवळ्या रंगात १.२४ पटीने अधिक आकर्षण असते.

सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसला पिवळा रंग हा दिला जातो. बस पिवळा रंग असल्याने दूरूनही स्पष्ट दिसू शकते. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची बस पावसात, रात्रीही स्पष्ट दिसते. त्यामुळे दुर्घटना होण्याचा धोकाही कमी असतो.

Leave a Comment