ग्रीन कार्ड अर्जदार, एच -1 बी व्हिसा धारकांना अमेरिकन सरकारने दिली 60 दिवसांची मुदतवाढ


नवी दिल्ली – अमेरिकन सरकारने ग्रीन कार्ड अर्जदार आणि एच -1 बी व्हिसाधारकांना 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे बिघडलेल्या परिस्थितीचा विचार करता, विविध कागदपत्रे ज्या लोकांना सादर करण्यास नोटीस देण्यात आली होती, त्यांना 60 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. शुक्रवारी याबाबतची माहिती यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने (USCIS) दिली. यानुसार ग्रीन कार्ड अर्जदार, एच -1 बी व्हिसाधारकांना आता पाठवण्यात आलेली नोटीस अथवा अर्जांना 60 दिवसांत प्रतिसाद मिळाल्यास त्यांचा विचार केला जाणार आहे.

यूएससीआयएसने सांगितले आहे की, कोरोना संकटात सापडलेल्या लोकांना त्यांच्या नोटीशीमधील विनंतीला काही वेळात आरामात प्रतिसाद देऊ शकतील व फॉर्म I-290B भरतील, असा या वाढीव मुदती मागचा हेतू आहे. कोणतीही कारवाई एच-1 बी व्हिसाधारक आणि ग्रीन कार्ड अर्जदारांवर करण्यापूर्वी, 60 दिवसांच्या आत प्राप्त झालेला Form I-290B फॉर्मही विचारात घेतला जाईल. अमेरिकन सरकारने एच-1 बी व्हिसाधारकांचा व्हिसा वाढविण्याचा निर्णय एप्रिलच्या सुरुवातीला घेतला होता. ज्यांच्या व्हिसा परवान्यांची मुदत संपुष्टात येत आहे आणि हे लोक कोरोनामुळे देश सोडू शकत नाहीत, अशा एच-1 बी व्हिसा धारकांकडून सरकारने अर्ज मागविले होते. अशा लोकांना देशात राहण्यासाठी वेळ देण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एच -1 बी हा तात्पुरता कामाचा व्हिसा असून अमेरिकन नागरिक नसलेल्या लोकांना हा व्हिसा विशेष कौशल्यासह दिला जातो, ज्यामुळे लोकांना अमेरिकेत काम करण्याची कायदेशीर परवानगी मिळते. पण आपण जर काही कारणास्तव अमेरिकेतील आपली नोकरी गमावली आणि आपण बेरोजगार झालात, तर अशा परिस्थितीत आपण अमेरिकेत एच -1 बी व्हिसावर जास्तीत जास्त 60 दिवस राहता येऊ शकते. यापेक्षा जास्त काळ राहण्यासाठी आपल्याला फार मोठी रक्कम भरावी लागते. लाखो भारतीय या व्हिसावर अमेरिकेत काम करत आहेत. पण आता यापैकी बऱ्याच भारतीयांना कोरोना संकटात पगाराविना रजेवर पाठविण्यात आले आहे. अशा लोकांना जूनपूर्वी कामावर घेतले नाही तर त्यांना देश सोडवा लागू शकतो.

Leave a Comment