हे कंपनी मालकही करणार विनावेतन काम


फोटो साभार पत्रिका
कोविड १९ संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था दशकांनी मागे पडली असताना बड्या कंपन्या नुकसान भरपाई होण्यासाठी खर्च कमी करण्याचे सर्व ते उपाय अमलात आणू लागल्या आहेत. रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कर्मचारी वेतन कपात करतानाच स्वतः विनावेतन काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. अंबानी यांच्या प्रमाणे अनेक बडे उद्योजक विना वेतन काम करणार आहेत.

महिंद्र कोटक बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचे पगार १५ टक्के कमी केले जाणार असल्याचे आणि ते स्वतः १ वर्ष १ रुपया वेतनावर काम करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी कर्मचारी वेतनात २० टक्के कपात करण्यात येणार असल्याचे आणि ते स्वतः दोन महिने पगार घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

महिंद्र अँड महिंद्रचे आनंद महिंद्र यांनीही विना वेतन काम करणार असल्याचे जाहीर केले आहेच पण कोविड १९ संकटात सरकारला मदतीचा हात पुढे करताना त्यांनी वाहनांचे उत्पादन बंद करून व्हेंटिलेटरचे उत्पादन सध्या सुरु केले आहे. ओयो रुम्सचे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल यांनीही १ वर्ष विनावेतन काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. हे सर्व उद्योजक सांगतात, कंपनीची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काही काळ जावा लागेल आणि खर्च कमी करणे हा आत्ताचा तातडीचा उपाय आहे. यामुळे कंपनी मुळपदावर येण्यासाठी आम्ही सर्वतोपरी पर्यंत करणार आहोत आणि त्याचच एक भाग म्हणून विनावेतन काम करणार आहोत.

Leave a Comment