जीवन पध्दतीत बदल निर्णायक

health
सध्या अमेरिकेत कंप्लीट हेल्थ इंप्रुव्हमेंट प्रोग्रॅम म्हणजे पूर्ण आरोग्य सुधारणा कार्यक्रम या नावाने एक वैद्यकीय उपचार विषयक अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. त्याला सीएचआयपी असे नाव देण्यात आले आहे. अशा प्रकारची एखादी योजना किंवा उपचार पध्दती विकसित करावीशी वाटावी यामागे काही कारणे आहेत. अमेरिकेतील लोक अनेक प्रकारच्या जीवन पध्दतीविषयक रोगांनी ग्रासलेले आहेत. त्यात मधूमेह अगदी सामान्य आहे. नंतर रक्तदाब आहे आणि शेवटी हृदयविकार आहे. हे सगळे विकार मनोकायिक विकार आहेत. म्हणजे होतात शरीराला पण उद्भवतात शरीरामध्ये. तेव्हा कितीही औषधे आणि गोळ्या घेतल्या तरी हे विकार आटोक्यात येत नाहीत. शेवटी अमेरिकेतले सारे वैद्यकीय तज्ञ अशा निष्कर्षाप्रत आले आहेत की हे विकार दुरूस्त करण्यासाठी जीवन पध्दती बदलणे हाच एकमेव उपाय आहे.

याच चिंतनातून हा कार्यक्रम विकसित करण्यात आला असून या कार्यक्रमानुसार केवळ दोन महिने जरी जीवन पध्दती अवलंबली तरी सारे मनोकायिक विकार आटोक्यात येतात. या जीवनपध्दतीमध्ये फार काही अवघड गोष्टी नाहीत. फळांचे रस पिण्याऐवजी फळे खा. भाज्यांचे सेवन करा. कोणतेही कडधान्य खाताना ते पॉलिश न करता खा. कांदा, टमाटर, मिरची ही कच्चीच खा. द्विदल धान्यांचा वापर करा आणि दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या. एवढे नियम पाळल्याने आयुष्यात बराच फरक पडतो. सध्याचे आपले आरोग्याचे प्रश्‍न जीवन पध्दतीतूनच निर्माण झाले असल्याने जीवन पध्दती बदलताच ते आटोक्यात यायला लागतात.

या लेखात व्यक्त करण्यात आलेले मत आणि विचार हे संबंधित लेखकाचे व्यक्तिगत मत आणि विचार असून त्याच्याशी ‘माझा पेपर’ सहमत असेल असे नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे या संदर्भात कोणताही वाद उद्भवल्यास त्यास ‘माझा पेपर’ जबाबदार राहणार नाही; याची कृपया नोंद घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment