हाय हिलपासून सावध

high-heel
उंच टाचांच्या चपला आणि सँडल वापरण्याची फॅशन चांगलीच रूढ आहे. विशेषतः महिलांमध्ये उंच टाचांच्या वहाणा वापरल्या जातात. कारण महिलांची उंची मुळात कमी असते. त्यांना आपण अधिक उंच दिसावे असे वाटत असते. परंतु अस्थिरोग तज्ञांचे असे मत आहे की उंच टाचांच्या चपला आणि सँडल्स वापरणे हितकारक नाही. अशा प्रकारच्या वहाणा वापरल्याने गुडघ्यावर जास्त भार पडतो आणि गुडघ्याचे सांधे बाधित होतात. म्हणून एक इंचापेक्षा अधिक उंचीच्या चपला किंवा सँडल्स वापरू नयेत. असा सल्ला तज्ञ डॉक्टर्स देत आहेत.

आपण दिवसभरात वाकतो, डावी उजवीकडे शरीराला वळवतो आणि आपल्या सांध्यांना निरनिराळ्या प्रकारच्या हालचाली करायला लावतो. या हालचाली तशा सांध्यांसाठी हितकारकच असतात. परंतु त्या नीट केल्या नाहीत तर अधिक नुकसानकारक ठरतात. तेव्हा सांध्यांचा वापर करून कोणतेही काम करताना काही पथ्ये पाळली पाहिजेत आणि आपल्या सांध्यांची ताकद टिकवून ठेवली पाहिजे. त्यासाठी पाळावयाचे पहिले पथ्य म्हणजे हाय हिल्सना राम राम ठोकणे.

दुसरे पथ्य म्हणजे कोणतीही वस्तू उचलताना उचलल्या जाणार्‍या वस्तूचा भार पूर्ण पंजावर किंवा जमल्यास पूर्ण हातावर पडेल अशी दक्षता घ्यावी. उचलल्या जाणार्‍या वस्तूचे वजन केवळ बोटावर तोलण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अतिरिक्त भार सांध्यांवरही पडतो आणि सांध्याचे नुकसान होते. कॅल्शियमचे चांगलेच सेवन करणे हे सुध्दा आवश्यक असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *