माउंट एव्हरेस्टवर चीनने सुरु केले ५ जी नेटवर्क


फोटो साभार भास्कर
गुरुवारी चीनने त्याच्या बाजूच्या माउंट एव्हरेस्ट बेस स्टेशनवर हायस्पीड ५ जी नेटवर्क सेवा सुरु केल्याचे जाहीर केले आहे. चीनी मिडिया सिन्हुआच्या बातमीनुसार चीन मधील सर्वात मोठी कंपनी चायना मोबाईलने ही सेवा सुरु केली असून त्यामुळे पर्यावरण देखरेख, गिर्यारोहकांचे लाईव स्ट्रीमिंग, रिसर्च यासाठी मदत होणार आहे. चायना मोबाईलच्या तिबेट प्रांतातील जनरल मॅनेजर सोउ मीन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

चीनने यापूर्वीच ५३०० मीटर आणि ५८०० मीटर उंचीवर एव्हरेस्ट बेस कॅम्प उभारले होते आता त्यांनी ६५०० मीटर उंचीवर नवा बेस कॅम्प उभारला आहे. हे बेस स्टेशन सुरु झाले असून यामुळे एव्हरेस्टच्या उत्तर शिखरापर्यंत ५ जी नेटवर्क सेवा देणे शक्य झाले आहे. एव्हरेस्टची एकूण उंची ८८४० मीटर आहे. येथील ५ जी सेवेचा डाऊनलोड स्पीड प्रतीसेकंद १.६६ गिगाबाईट आहे तर अपलोड स्पीड प्रतीसेकंद २१५ मेगाबाईट असल्याचे जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment