कुटुंबियांसाठी इरफानने मागे ठेवली इतकी मालमत्ता


फोटो डेली मिरर
बॉलीवूड अभिनेता इरफान खान याचे वयाच्या ५३ व्या वर्षी २९ एप्रिल रोजी निधन झाल्यानंतर त्याने त्याच्या कुटुंबासाठी मागे काय ठेवले याची चर्चा मिडियामध्ये सुरु झाली आहे. त्या संदर्भात बरीच माहिती येत असून इरफान याने त्याची दोन मुले आणि पत्नी यांच्यासाठी ३१४ कोटींची संपत्ती ठेवली असल्याचे सांगितले जात आहे.

इरफान चित्रपटाप्रमाणेच टीव्ही जाहिराती, आणि चित्रपटाच्या नफ्यातील हिस्सा अशीही कमाई करत असे. त्याचे मुंबईत एक अलिशान घर आहे आणि जुहू येथे एक सदनिका. नैनिताल येथे त्याने त्याचे स्वप्नातील घरकुल उभारले आहे. त्याने ११० कोटींची गुंतवणूकही केलेली आहे. इरफान एका चित्रपटासाठी १० ते १५ कोटी आणि जाहिरातीसाठी ४ ते ५ कोटी फी आकारत असे असे सांगितले जात आहे.

त्याला अलिशान कार्सचा शौक होता आणि त्याच्याकडे टोयोटा सेलिका, बीएमडब्ल्यू. मसरटी, ऑडी अश्या अनेक कार्स आहेत. लंडन मध्ये त्यांच्यावर कॅन्सरसाठी उपचार सुरु होते तेव्हा तो दीर्घकाळ बॉलीवूड पासून दूर होता. नुकतीच त्याची इंग्रजी मिडीयम ही फिल्म रिलीज झाली होती. त्याच्या आजारपणा नंतर त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Leave a Comment