व्हिडीओ : या डिलिव्हरीमॅनसाठी चक्क ग्राहकानेच ऑर्डर केला वाढदिवसाचा केक, बघा पुढे काय झाले

कोरोना व्हायरस महामारीने लोकांचे आयुष्य एकाच जागी थांबवले आहे. असे असले तरी काहीजण सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. चीनच्या वुहान शहरात देखील काही अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. यात फुड डिलिव्हरीचा देखील समावेश आहे.

मात्र या सर्व गडबडीत एक डिलिव्हरी मॅन 15 एप्रिलला आपला वाढदिवस साजरा करण्यासच विसरला. आपल्या खास दिवशी देखील ही व्यक्ती कामच करत होती. मात्र एका अनोळखी व्यक्ती त्याचा दिवस स्पेशल बनवला.

(व्हिडीओ सौजन्य – सीजीटीएन)

डिलिव्हरी मॅनकडे केकची मागणी आली होती. त्यामुळे तो केक घेण्यासाठी बेकरी शॉपमध्ये गेला. मात्र हा केक त्याच्यासाठीच आहे, हे समजल्यावर त्याला देखील विश्वास बसला नाही.

डिलिव्हरी मॅनने असंख्य वेळा हा केक नक्की माझ्यासाठीच आहे का ? असे विचारले व मी त्याला अनेकदा हो हेच उत्तर दिले. हे खरे आहे का हे देखील त्याने अनेकदा तपासून पाहिले व खात्री पटल्यावर तो केक स्विकारला. केक स्विकारताना त्याला आनंदाने रडू आले.

बेकरी शॉपच्या बाहेरील कॅमेऱ्यात हा सर्व घटनाक्रम कैद झाला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, डिलिव्हरी मॅन पायऱ्यांवर बसून, भावूक होऊन स्वतःच्या वाढदिवसाचा केक खात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Leave a Comment