ही कंपनी ग्राहकांना मोफत देत आहे 14जीबी डेटा आणि कॉलिंग सेवा

लॉकडाऊनच्या काळात टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणत आहे, सोबतच मोफत डाटा देखील देत आहेत. आता व्होडाफोन-आयडिया आपल्या ठराविक ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग देत आहे. हे फ्री बेनेफिट्स ग्राहकांना 7 दिवस मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना 14 जीबींचा फायदा होणार आहे.

कंपनी डेटा आणि कॉलिंग मोफत कोणत्याही ग्राहकांना देत आहे. ग्राहकांना यासाठी कोणतेही नवीन रिचार्ज करावे लागत नसून, सध्याच्या प्लॅनमध्येच हे बेनेफिट्स दिले जात आहेत.  ग्राहक 121363 क्रमांकावर कॉल करून याबाबत माहिती जाणून घेऊ शकतात.

ज्या ग्राहकांना याचा लाभ मिळेल, त्यांना कंपनीकडून मेसेज येईल. लॉकडाऊनच्या काळात कंपनीकडून हे खास गिफ्ट आहे. अनेक युजरने याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. मात्र कंपनीकडून अद्याप याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

आजतकच्या वृत्तानुसार, चेन्नई, कोलकत्ता, नवी दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील निवडक ग्राहकांना कंपनी मोफत 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देत आहे.

याआधी जिओने देखील 4 दिवसांसाठी निवडक ग्राहकांना 2जीबी अतिरिक्त डेटा दिला होता.

Leave a Comment