लॉकडाऊनमुळे नागरिक आपआपल्या घरात कैद असल्याने मोबाईलचा आणि ऑनलाईन सेवांचा सर्वाधिक वापर होत आहे. गुगलने सर्च ट्रेंड्सचे खास रिझल्ट शेअर केले आहेत. या ट्रेंमध्ये भारतीयांनी लॉकडाऊनमध्ये कोणत्या गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या आहेत, याची माहिती मिळते.
रेशनचे दुकान ते वर्क फ्रॉम होम, भारतीय गुगलवर करत आहेत या गोष्टी सर्च
गुगलच्या ‘What is India searching for?’ नावाच्या रिपोर्टमध्ये या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या टॉप-5 ट्रेंड्सला लिस्ट करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे आयुष्य किती बदलले आहे, हेच या सर्च ट्रेंडमधून दिसून येते.
भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक जीवनावश्यक वस्तू सर्च केल्या आहेत. ‘Near me’ सर्चमध्ये रेशन दुकान, प्राण्यांचा डॉक्टर, फार्मेसी आणि ग्रॉसरी डिलिव्हरी सर्च मार्चपासून वाढले आहे. रेशन दुकान सर्चमध्ये तब्बल 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बेस्ट सर्चेमध्ये हेडसेट, 2डब्ल्यू विमा, मॅट्रेस, मूव्हीस ऑन यूट्यूब आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.
घरी राहून गोष्टी शिकायच्या सर्चमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. याशिवाय लोक घरच्या घरी जीम, 4 मिनिटांची रेसिपी, लर्न ऑनलाईन, टीच ऑनलाईन, एट होम लर्निंग, मशिन लर्निंग आणि डाटा सायन्स देखील सर्च करत आहेत.
तसेच इमिन्युटी कीवर्ड 500 टक्के, विटामिन सी 150 टक्के आणि कंसल्ट ऑनलाईन डॉक्टर या कीवर्डमध्ये 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय ऑनलाईन पेमेंटमध्ये “how to change UPI PIN” सर्चमध्ये 200 टक्क्यांची वाढ झाली आहे. यात “how to pay electric bill online”, “overnight mutual funds” आणि हिंदीत “electricity bill check” याचा देखील समावेश आहे.
लॉकडाऊनमुळे विद्यार्थी आणि प्रोफेशनल्ससाठी देखील मोठा बदल झाला आहे. 2 पैकी प्रत्येकी एक युजर “how to homeschool kids” आणि “how to WFH” सर्च करत आहे. “collaborative software” आणि “free video dating” या सर्चचा देखील यात समावेश आहे. तसेच, भारतीयांनी आठवड्यातील प्रत्येकी 4 तास व्हिडीओ पाहण्यात घालवले आहेत.