भारतीय बाजारात लवकरच डीसी अवंती (DC Avanti) इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच होण्याची शक्यता आहे. ही भारताची पहिली पुर्ण इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असेल. या कारचे डिझाईन डीसी टीसीएपासून (टायटेनियम, कार्बन आणि अॅल्यूमिनियम) घेण्यात आलेले आहे. म्हणजेच या कारला तीन धातूंपासून बनविण्यात आलेले आहे.
भारतात लवकरच लाँच होणार पहिली वहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार
या कारला पहिल्यांदा 2018 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आले होते. कारमध्ये नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 320 पीएस पॉवर जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसोबत येते.
डीसीची ही पहिली इलेक्ट्रिक पॉवरट्रेन स्पोर्ट्स कार स्विर्झलँडच्या एका कंपनीत तयार करण्यात आले आहे. डीसीच्या आगामी स्पोर्ट्स कारमध्ये 160 केडब्ल्यूएचची बॅटरी असेल. कंपनीने दावा केला आहे की, ही कार केवळ 5.5 सेंकदांमध्ये ताशा 0 ते 100 किलोमीटरचा वेग पकडते.
अमर उजालाच्या वृत्तानुसार, या कारचे बरेचसे काम पुर्ण झालेले आहे. सध्या याच्या इंटेरियर आणि लाईटच्या डिझाईनवर काम सुरू आहे. डीसी अंवती इलेक्ट्रिकला 2022 मध्ये बाजारात आणण्याची शक्यता आहे. किंमतीबद्दल सांगायचे तर याची किंमत जवळपास 40 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.