ऐतिहासिक नोंद; मारुती सुझुकीने एप्रिलमध्ये भारतात विकली नाही एकही कार

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका देशातील प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राला देखील मोठे नुकसान झाले आहे. मारुती सुझुकीने एप्रिल 2020 मध्ये स्थानिक बाजारात एकही कारची विक्री केली नसल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व प्लांट बंद केल्याने असे झाले.

लॉकडाऊनमुळे संपुर्ण एप्रिल महिना शोरूम बंद होते. त्यामुळे या महिन्यात एकही कारची विक्री झाली नाही. मात्र बंदर सुरू झाल्यानंतर कंपनीने मुंदडा बंदरावरून 632 कार्स निर्यात केल्या.

मार्च 2019 च्या तुलनेत 2020 मार्चमध्ये कंपनीची विक्री 47.4 टक्क्यांनी कमी झाली. या वर्षी मार्चमध्ये कंपनीने 79,080 यूनिट्सची विक्री केली. केवळ मारूतीच नाहीतर प्रत्येक ओरिजनल इक्यूपमेंट मॅन्युफॅक्चररची हीच स्थिती आहे.

मारुती सुझुकी सामान्य स्थितीमध्ये महिन्याला सरासरी दीड लाख कार्सची निर्मिती करते. कंपनी देशाच्या बाहेर देखील विक्री करते.   कंपनीने माहिती दिली की सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करत एप्रिल महिन्यात मूंदडा बंदरावरून 632 कार्स निर्यात करण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे डिलरशीप बंद असल्याने एमजी मोटर इंडियाने देखील एप्रिल महिन्यात एकही गाडीची विक्री केली नाही.

Leave a Comment