पावणेसात कोटी खर्च करुन अमेरिकेत नोकरीसाठी परत जाणार हे भारतीय

लॉकडाऊनमुळे अमेरिकेत काम करणारे अनेक भारतीय देशात अडकले आहेत. मात्र अमेरिकेतील आपली नोकरी वाचविण्यासाठी हे सर्वजण खास योजनेवर काम करत आहेत. अमेरिकेत काम करणाऱ्या या भारतीयांनी पुन्हा अमेरिकेला जाण्यासाठी 9 लाख डॉलर्स (जवळपास 6.75 कोटी रुपये) जमा करण्याची योजना बनवली आहे. जेणेकरून ते चार्टर विमानाने अमेरिकेला जाऊ शकतील. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हैदराबाद येथील एच-1बी व्हिसा असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की,  जेव्हा मला कॅलिफोर्नियातील कंपनीकडून 9 लाख डॉलर्सची योजना समजली, तेव्हा एवढे सर्वजण येण्याची शक्यता खूप कमी वाटली. मात्र सोशल मीडियावर या संदर्भात माहिती पसरताच अनेकांनी याविषयी सकारात्मक उद्देश दर्शवला.

त्याच्या प्रमाणेच शेकडो एच-1बी व्हिसाधारक भारतात अडकले आहेत. अमेरिकन सरकारकडून पाठवण्यात आलेल्या स्पेशल विमानात ते जाऊ शकले नाहीत, कारण ते अमेरिकन नागरिक नाहीत.

कंपनीच्या करस्पॉंडटनुसार, एअरबस ए330 च्या 283 सीट्स, मात्र 100 प्रवाशांचा खर्च 9 लाख डॉलर्स ते 9.50 लाख डॉलर्स एवढा असेल. तर बोईंग 767 च्या 278 सीट्स व समान प्रवाशांचा खर्च 8.50 लाख डॉलर्स ते 9 लाख डॉलर्स येऊ शकतो.

इतर प्रवासी देखील दुसऱ्या खाजगी चार्टर प्लाईट कंपनीशी या संदर्भात चर्चा करत असून, त्यांनी प्रवासासाठी कमी खर्चाची प्लाईट मिळत असल्याचे, काहींनी सांगितले. मात्र चार्टर प्लाईटची योजना सध्या प्राथमिक टप्प्यात आहे, शिवाय याला परवानगी देखील अद्याप मिळालेली नाही.

काहींनी सांगितले की, जागतिक अर्थव्यवस्था डगमगली आहे. कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. सध्या आम्ही भारतातून काम करत आहोत. मात्र दुसऱ्या देशातून किती दिवस काम करणार यासाठी देखील मर्यादा आहेत. कोणत्याही किंमतीत अमेरिकाला जाण्याची इच्छा असल्याचे देखील अनेकांनी सांगितले.

Leave a Comment