लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अॅप लाँच करणार आहे.
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अॅप ‘जिओमीट’
जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि झूम अॅपला टक्कर देईल. आपल्या जिओ प्लॅटफॉर्म अंतर्गतच कंपनी जिओमीट अॅप लाँच करणार असल्याची कंपनीने घोषणा केली आहे.
जिओमीट अँड्राईड, आयओएससह विंडोस आणि मॅकओएस या कॉम्प्युटर प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. आउटलूक, गुगल क्रोम आणि मोझिल्ला फायरफॉक्सद्वारे देखील हा प्लॅटफॉर्म वापरता येईल. युजर या अॅपवर इमेलचा वापर करून लॉगइन करू शकता, याशिवाय गेस्ट म्हणून देखील सहभागी होऊ शकता.
यासाठी कंपनीने jiomeet.jio.com ही खास वेबसाईट देखील सुरू केली आहे. याआधी देखील रिलायन्सने जिओचॅट आणि जिओ ग्रुप टॉक अॅपद्वारे व्हिडीओ अॅप आणण्याचा प्रयत्न केला होता.