असे परत मिळणार चुकीच्या खात्यात गेलेले पैसे

पैसे दुसऱ्याला पाठवण्यासाठी सध्या इंटरनेट बँकिंग, यूपीआयसह अनेक साधने आहेत. मात्र अनेकदा पैसे पाठवताना गडबडीत चुकीचा खाते क्रमांक टाकल्यास दुसऱ्याच्याच खात्यात पैसे जातात. अशा स्थितीत त्वरित पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

ज्या व्यक्तीला पैसे पाठवले आहेत, त्याला पैसे पोहचले का याची सर्वात प्रथम खात्री करावी. जर योग्य व्यक्तीच्या खात्यात पैसे न पोहचल्यास नाव, अकाउंट नंबर, बँक इत्यादी तपासून पाहावे.

बँकेला द्या त्वरित माहिती –

जर तुम्ही चुकीने दुसऱ्याच खात्यात पैसे टाकल्यास याबाबतची माहिती त्वरित बँकेला द्यावी. सोबतच लिखित स्वरूपात व्यवहाराची तारीख, वेळ, दोन्ही खात्यांचे अकाउंट नंबर इत्यादी माहिती द्यावी.

अनेकदा परत येतात पैसे –

अनेकदा चुकीचा खाते क्रमांक, आयएफएससी कोड टाकल्यास पैसे आपोआप खात्यात परत येतात. पैसे परत न आल्यास बँकेशी संपर्क साधावा. जर हे चुकीचे ट्रांझक्शन तुमच्याच बँकेतील खात्यात झाले असल्यास, पैसे लवकर परत मिळतील.

दुसऱ्या बँकेच्या खात्यात रक्कम गेल्यास, पैसे परत मिळण्यास वेळ लागू शकतो. यासाठी दोन महिने देखील लागू शकतात. तुम्ही आपल्या बँकेत कोणत्या शहरातील कोणत्या ब्रँचच्या खात्यात पैसे गेले आहेत याची माहिती मिळवू शकतात.

याशिवाय तुम्ही एखाद्या खात्यात पैसे ट्रांसफर केल्यास, एक मेसेज देखील येतो. ज्यात चुकीच्या खात्यात पैसे पाठवल्यास या क्रमांकावर मेसेज करा, असा उल्लेख असतो. आरबीआयने देखील अशा प्रकरणात बँकांना लवकरात लवकर पाऊल उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment